नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समध्ये पतियाळा येथील एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मोटार पार्किंगवरून एका तरूणाशी झालेल्या वादातून ही हत्या झाली. एकम सिंग साहनी (वय १८) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो पतियाळाच्या राजपुरा शहरातील गुलाबनगर कॉलनी येथील रहिवासी होता. ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स शहरात काही वर्षांपूर्वी त्याचे कुटुंब स्थायिक झाले होते. गुरुवारी रात्री १२:४५ च्या सुमारास एकम सिंग शहरातील एका पार्किंग लॉटमध्ये अभ्यास करत होता. त्यावेळी मोटार लावण्यावरून एका तरुणाशी झालेल्या वादानंतर काही तरुणांनी एकम सिंगवर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला. एकम सिंगची गाडीही पेटवून देण्यात आली.
Fans
Followers